E-shram Card Holders: असंघठित क्षेत्रातील कामगार लोकांना मदत करण्याच्या हेतूने केंद्र सरकार द्वारा सुरू केलेली ही ई-श्रम कार्ड योजना खूप महत्वाकांक्षी आणि कामगारांना मोठा फायदा देणारी आहे. त्यामुळे या योजने अंतर्गत, सरकार मागील काही महिन्यांपासूनच कामगार लोकांना नियमितपणे आर्थिक मदत करत आहे. सध्या च्या घडीला सरकारने या योजनेंतर्गत नवीन हप्ता जाहीर करून कामगारांना आर्थिक मोठा लाभ देण्याचा निर्णय घेन्यात आला आहे.
ई-श्रम कार्ड योजनेचे उद्धीष्ट स्पष्ट आहे जे असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत त्यांच्या नावांची यादी तयार करून त्यांना नियमितपणे सरकार मदत करत आहे. या योजनेचा कामगारांना खूप फायदा होत असून, त्यातून त्यांच्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत होत असल्याने त्यांचाही तान कमी करण्यास मदत होत आहे.
या ई-श्रम कार्ड योजनेंतर्गत, आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीने जारी केलेला पहिला चेक गेल्या वर्षीच्या 12 ऑगस्ट या तारखेला वाटप करण्यात आला होता. त्यांनंतर काही महिन्यानंतरच दूसरा हप्ता वितरित करण्यात आला होता. आणि आता सरकारने कामगारांसाठी तिसरा हप्ता जाहीर केला आहे, यामुळे कामगारांना एकूण ६००० रुपयांचा लाभ मिळणार आहे.
ई-श्रम कार्ड योजनेचे तुम्हाला मिळणारे खास फायदे
या योजनेंतर्गत आपल्याला मिळणारे फायदे निमनलिखित शब्दात खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत.
- रोजगार संधी: श्रमिक कामगारांची माहिती सरकारकडे असल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.
- अपघात विमा सुरक्षा: ई-श्रम कार्ड धारकांना २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मिळत असतो, जो अपघातवेळी मोठी आर्थिक मदत करू शकतो.
- पेन्शन योजना: ६० वर्षानंतर ई-श्रम कार्ड धारकांना मासिक पेन्शन मिळू शकते, ज्यामुळे त्यांना वृद्धापकाळात आर्थिक मदत मिळू शकते.
- सरकारी योजनांचा थेट लाभ: या कार्ड द्वारे सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळू शकतात जसे की विमा, पेन्शन आणि आर्थिक सहाय्य यांचा थेट लाभ मिळतो.
- डिजिटल ओळख: ई-श्रम कार्ड हे श्रमिक धारकांना डिजिटल ओळख देते, ज्यामुळे त्यांना विविध योजनांमद्धे याचा ओळखपत्र म्हणून उपयोग होतो.
- आर्थिक मदत: या योजनेंतर्गत कामगारांना वेळोवेळी मदत करण्यात येते, सोबतच प्रत्येक कामगारास दरमहा ५००, १०००, २००० रुपये इतकी मदत मिळत आहे, हे असून या वर्षी सरकारने त्यांच्या खात्यात सरकारने ६००० रुपये जमा केले आहेत.
- आरोग्य सुविधांचा लाभ: ई-श्रम कार्ड धारकांना भविष्यकालिन आरोग्य योजनांचा आणि सरकारी आरोग्य सुविधांचा लाभ मिळतो.
ई-श्रम कार्ड नोंदणी आणि लाभ तपासा
ई-श्रम कार्डची नोंदणी करण्यापूर्वी कामगारांना काही कागदपत्रे लागतील. त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि इतर माहिती पुरवणे गरजेचे आहे. या योजनेची नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते. याची नोंदणी झाल्यानंतर त्यांना एक विशिष्ट प्रकारचा १४ डिजिट क्रमांक देण्यात येतो, त्याला ई-श्रम कार्ड क्रमांक म्हटले जाते.
आता काहिंना शंका असते की आपली नोंद झाली का नाही, जर झाली तर मग ते कसे तपसायचे. ज्यांना अशी शंका व्यक्त होत असेल ते श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ती माहिती पाहू शकतात. याव्यतिरिक्त त्यांना तिथे ई-श्रम कार्ड पेमेंट स्टेटस देखील तपासता येते.
तुम्ही चेक करत असताना लाभार्थी यादीत तुमचे नाव आढळल्यास, कामगारांना सरकार डीबीटी या मार्गाने थेट आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यासाठी प्रामाणिकपणे ई-श्रम कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक नोंदविण्याची गरज आहे.
ई-श्रम कार्ड पेमेंट लिस्ट मध्येही नाव आढळत नसेल, तर कामगारांना यासंदर्भात श्रम आणि रोजगार मंत्रालयाशी संपर्क साधावा लागेल आणि तिथून माहिती मिळवावी लागेल.
ई-श्रम कार्ड पेमेंट लिस्ट कशी तपसावी
कामगारांना जर ई-श्रम कार्ड पेमेंट तपासण्याची गरज भासल्यास, ते खालील पद्धतीने तपासू शकतात:
- सर्वात पहिले सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर (www.eshram.gov.in) जाणे.
- नंतर समोर दिसणाऱ्या होमपेजवरील “ई-श्रम कार्ड पेमेंट लिस्ट चेक” या पर्यायावरती क्लिक करा.
- तिथे आपला ई-श्रम कार्ड क्रमांक प्रविष्ट करा.
- मग लॉग इन बटन वरती क्लिक करून लॉग इन करा.
- मग समोर आपल्याला पेमेंट लिस्ट दिसेल.
या सर्व तपासणी प्रक्रिये साठी आवश्यक असलेले ई-श्रम कार्ड क्रमांक आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे. जर त्यांच्याकडे हे नसेल तर त्यांनी त्यांचे स्थानिक श्रम अधिकारी किव्हा रोजगार कार्यालयाशी संपर्क साधावा.
सर्वसामान्य कामगारांसाठी ही योजना लाभकारी ठरली आहे. या योजणेमुळे उच्चवर्गीय नागरिकांना दरमहा २००० रुपयांची राशी मिळत आहे. याचाच अर्थ असा आहे की कामगारांच्या कुटुंबीयांना याचा खूप लाभ होत असल्याने ते याचा वापर आपल्या उपजीविकेसाठी करु शकतात.
या ई-श्रम कार्ड योजनेचा उद्देश असंघठीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा देण्याचा आहे, त्यामुळे सरकार त्यांच्या नावांची यादी मोठ्या प्रमाणात तयार करत आहे आणि त्यांना नियमितपणे लाभ देत आहे. या उपकमाच्या माध्यमातून सरकार कामगारांच्या सुखसोयी, आर्थिक सुविधा व विकासाकडे दक्षतेने लक्ष देत आहे.